वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • १ शमुवेल १
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

१ शमुवेल रूपरेषा

      • एलकाना आणि त्याच्या दोन बायका (१-८)

      • मूल होण्यासाठी हन्‍नाने केलेली प्रार्थना (९-१८)

      • शमुवेलचा जन्म; तो यहोवाला दिला जातो (१९-२८)

१ शमुवेल १:१

तळटीपा

  • *

    किंवा “रामा या ठिकाणी, सूफचा एक वंशज.”

समासातील संदर्भ

  • +यहो १६:५
  • +१शमु १:१९; ७:१५, १७
  • +१इत ६:२२, २७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१/१९९८, पृ. १६

१ शमुवेल १:३

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

  • *

    किंवा “याला नमन.”

समासातील संदर्भ

  • +निर्ग २३:१४; ३४:२३; अनु १२:५, ६; यहो १८:१; शास २१:१९; लूक २:४१
  • +१शमु २:१२, २२; ४:१७
  • +गण ३:१०; अनु ३३:१०; मला २:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अनुकरण, पृ. ५८, ६२

    टेहळणी बुरूज,

    १/१/२०११, पृ. २४-२५

    ३/१/१९९८, पृ. १६

१ शमुवेल १:४

समासातील संदर्भ

  • +लेवी ७:१५

१ शमुवेल १:५

तळटीपा

  • *

    शब्दशः “तिचं गर्भाशय बंद केलं असलं.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अनुकरण, पृ. ६०

    टेहळणी बुरूज,

    १/१/२०११, पृ. २५

१ शमुवेल १:७

तळटीपा

  • *

    शब्दशः “घरात.”

समासातील संदर्भ

  • +अनु १६:१६; १शमु २:१८, १९

१ शमुवेल १:८

तळटीपा

  • *

    किंवा “इतकी दुःखी होऊ नकोस.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अनुकरण, पृ. ५९-६०

    टेहळणी बुरूज,

    १/१/२०११, पृ. २५

    ४/१/२००५, पृ. १९

१ शमुवेल १:९

तळटीपा

  • *

    म्हणजे, उपासना मंडपाकडे.

समासातील संदर्भ

  • +निर्ग २५:८; १शमु ३:३; २शमु ७:२

१ शमुवेल १:१०

समासातील संदर्भ

  • +स्तो ५५:२२; ६५:२

१ शमुवेल १:११

समासातील संदर्भ

  • +उत्प ३०:२२
  • +गण ६:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ४/२०१७, पृ. ४-५

    अनुकरण, पृ. ६५

    टेहळणी बुरूज,

    १/१/२०११, पृ. २७

१ शमुवेल १:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अनुकरण, पृ. ६३-६४

    टेहळणी बुरूज,

    १/१/२०११, पृ. २६

    २/१/२००१, पृ. २०

१ शमुवेल १:१५

समासातील संदर्भ

  • +स्तो ४२:६; ६२:८; १४२:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१/२००१, पृ. २०-२१

१ शमुवेल १:१६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१/२००१, पृ. २०-२१

१ शमुवेल १:१७

समासातील संदर्भ

  • +१शमु १:११

१ शमुवेल १:१८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अनुकरण, पृ. ६४-६५

    टेहळणी बुरूज,

    १/१/२०११, पृ. २६, २८

१ शमुवेल १:१९

समासातील संदर्भ

  • +१शमु १:१
  • +१शमु १:११; स्तो ६६:१९; नीत १५:२९

१ शमुवेल १:२०

तळटीपा

  • *

    किंवा कदाचित, “नेमलेली वेळ आल्यावर.”

  • *

    म्हणजे, “देवाचं नाव.”

समासातील संदर्भ

  • +उत्प ५:२९; ४१:५१; निर्ग २:२१, २२; मत्त १:२१

१ शमुवेल १:२१

समासातील संदर्भ

  • +१शमु १:३

१ शमुवेल १:२२

समासातील संदर्भ

  • +अनु १६:१६
  • +१शमु १:११; २:११; २इत ३१:१६

१ शमुवेल १:२४

तळटीपा

  • *

    २२ लीटरच्या भांड्यात मावेल इतकं पीठ. अति. ख१४ पाहा.

  • *

    शब्दशः “घरात.”

समासातील संदर्भ

  • +गण १५:८-१०
  • +यहो १८:१

१ शमुवेल १:२६

समासातील संदर्भ

  • +१शमु १:१५

१ शमुवेल १:२७

समासातील संदर्भ

  • +१शमु १:११, १७; स्तो ६६:१९

१ शमुवेल १:२८

तळटीपा

  • *

    शब्दशः “उसना देत आहे.”

  • *

    हे एलकानाला सूचित करतं असं दिसतं.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ४/२०१७, पृ. ५

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

१ शमु. १:१यहो १६:५
१ शमु. १:११शमु १:१९; ७:१५, १७
१ शमु. १:११इत ६:२२, २७
१ शमु. १:३निर्ग २३:१४; ३४:२३; अनु १२:५, ६; यहो १८:१; शास २१:१९; लूक २:४१
१ शमु. १:३१शमु २:१२, २२; ४:१७
१ शमु. १:३गण ३:१०; अनु ३३:१०; मला २:७
१ शमु. १:४लेवी ७:१५
१ शमु. १:७अनु १६:१६; १शमु २:१८, १९
१ शमु. १:९निर्ग २५:८; १शमु ३:३; २शमु ७:२
१ शमु. १:१०स्तो ५५:२२; ६५:२
१ शमु. १:११उत्प ३०:२२
१ शमु. १:११गण ६:५
१ शमु. १:१५स्तो ४२:६; ६२:८; १४२:२
१ शमु. १:१७१शमु १:११
१ शमु. १:१९१शमु १:१
१ शमु. १:१९१शमु १:११; स्तो ६६:१९; नीत १५:२९
१ शमु. १:२०उत्प ५:२९; ४१:५१; निर्ग २:२१, २२; मत्त १:२१
१ शमु. १:२११शमु १:३
१ शमु. १:२२अनु १६:१६
१ शमु. १:२२१शमु १:११; २:११; २इत ३१:१६
१ शमु. १:२४गण १५:८-१०
१ शमु. १:२४यहो १८:१
१ शमु. १:२६१शमु १:१५
१ शमु. १:२७१शमु १:११, १७; स्तो ६६:१९
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
१ शमुवेल १:१-२८

१ शमुवेल

१ एफ्राईमच्या+ डोंगराळ प्रदेशातल्या रामाथाईम-सोफीम या ठिकाणी एक माणूस* राहायचा.+ त्याचं नाव एलकाना+ होतं. हा एफ्राइमी माणूस यरोहामचा मुलगा होता; यरोहाम अलीहूचा, अलीहू तोहूचा आणि तोहू हा सूफचा मुलगा होता. २ एलकानाला दोन बायका होत्या. एकीचं नाव हन्‍ना, तर दुसरीचं नाव पनिन्‍ना. पनिन्‍नाला मुलंबाळं होती. पण हन्‍नाला मात्र एकही मूल नव्हतं. ३ तो माणूस दरवर्षी, सैन्यांचा देव यहोवा* याची उपासना* करण्यासाठी आपल्या शहरातून शिलो इथे जायचा.+ तिथे एलीची दोन मुलं, हफनी आणि फिनहास+ हे याजक म्हणून यहोवाची सेवा करायचे.+

४ एकदा जेव्हा एलकानाने देवाला बलिदान अर्पण केलं, तेव्हा त्याने आपली बायको पनिन्‍ना हिला आणि तिच्या सगळ्या मुलामुलींना त्या बलिदानातून वाटे दिले.+ ५ पण हन्‍नाला मात्र त्याने बलिदानातला खास वाटा दिला. कारण यहोवाने जरी तिला मूलबाळ दिलं नसलं,* तरी एलकानाचं तिच्यावर सगळ्यात जास्त प्रेम होतं. ६ यहोवाने हन्‍नाला मूलबाळ दिलं नव्हतं, म्हणून तिची सवत तिला दुखावण्यासाठी सतत टोमणे मारायची. ७ असं ती प्रत्येक वर्षी करायची. हन्‍ना जेव्हा-जेव्हा यहोवाच्या उपासना मंडपात* जायची+ तेव्हा-तेव्हा तिची सवत तिला खूप टोमणे मारायची; इतके की हन्‍ना फार रडायची आणि जेवायचीही नाही. ८ तिचा नवरा एलकाना तिला एकदा म्हणाला: “हन्‍ना, तू का रडतेस? तू जेवत का नाहीस? इतकं मनाला लावून घेऊ नकोस.* मी आहे ना. मी तुला दहा मुलांपेक्षा जास्त नाही का?”

९ मग, शिलोमध्ये त्या सगळ्यांचं खाणंपिणं आटोपल्यावर हन्‍ना उठली आणि यहोवाच्या मंदिराकडे*+ गेली. त्या वेळी एली मंदिराच्या दाराजवळ आपल्या आसनावर बसला होता. १० हन्‍नाचं मन अतिशय कटू झालं होतं. तिला दुःख अनावर होऊन ती तिथे घळाघळा रडू लागली आणि यहोवाला कळकळून प्रार्थना करू लागली.+ ११ तिने असा नवस केला: “हे सैन्यांच्या देवा यहोवा! पाहा मी किती दुःखी आहे. तू जर माझी आठवण ठेवलीस आणि तुझ्या या दासीला एक मुलगा दिलास,+ तर हे यहोवा, मी त्याला आयुष्यभर तुझी सेवा करायला देईन. त्याच्या डोक्याला कधीही वस्तरा लागणार नाही.”+

१२ हन्‍ना बराच वेळ यहोवाला प्रार्थना करत होती तेव्हा एलीचं लक्ष तिच्याकडे होतं. १३ ती मनातल्या मनात प्रार्थना करत होती. तिचे ओठ हलत होते, पण आवाज मात्र ऐकू येत नव्हता. म्हणून एलीला वाटलं, की ती नशेत आहे. १४ तो तिला म्हणाला: “अशी किती वेळ नशेत राहणार? जा, नशा उतरल्यावर ये.” १५ त्यावर हन्‍ना त्याला म्हणाली: “नाही माझ्या प्रभू! मी द्राक्षारस किंवा दारू प्यायले नाही. मी दुःखी स्त्री आहे, आणि यहोवापुढे आपलं मन मोकळं करत आहे.+ १६ तेव्हा आपल्या या दासीला वाईट स्त्री समजू नका. खरंतर मी अतिशय दुःखात आणि चिंतेत आहे, आणि म्हणून मी इतका वेळ प्रार्थना करत आहे.” १७ तेव्हा एली तिला म्हणाला: “शांत मनाने जा. तू इस्राएलच्या देवाकडे जी विनंती केली आहेस ती तो पूर्ण करो.”+ १८ त्यावर हन्‍ना म्हणाली: “आपल्या या दासीवर नेहमी आपली कृपा असो.” मग ती स्त्री तिथून निघून गेली आणि जाऊन तिने जेवण केलं. त्यानंतर मात्र तिचा चेहरा उदास राहिला नाही.

१९ मग ते सगळे पहाटेच उठले आणि त्यांनी यहोवाला दंडवत घातला. त्यानंतर ते रामा इथे आपल्या घरी परत गेले.+ पुढे एलकानाने आपली बायको हन्‍ना हिच्याशी संबंध ठेवले आणि यहोवाने हन्‍नाची आठवण केली.+ २० एका वर्षाच्या आत* हन्‍नाला दिवस गेले आणि तिला एक मुलगा झाला. तिने त्याचं नाव+ शमुवेल* ठेवलं. कारण ती म्हणाली: “मी त्याला यहोवाकडून मागून घेतलंय.”

२१ काही काळाने एलकाना आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत, यहोवासाठी दरवर्षी केलं जाणारं बलिदान अर्पण करायला+ आणि आपलं नवस फेडण्याचं अर्पण द्यायला गेला. २२ पण हन्‍ना मात्र त्यांच्यासोबत गेली नाही.+ कारण ती आपल्या नवऱ्‍याला म्हणाली: “एकदा का बाळाचं दूध तुटलं, की मी त्याला यहोवापुढे घेऊन जाईन. मग तो कायम तिथेच राहील.”+ २३ तेव्हा एलकाना तिला म्हणाला: “तुला जसं ठीक वाटतं तसं कर. बाळाचं दूध तुटेपर्यंत घरीच थांब. तू जे म्हणालीस ते यहोवा पूर्ण करो.” म्हणून ती स्त्री घरीच राहिली आणि आपल्या मुलाचं दूध तुटेपर्यंत तिने त्याला अंगावर पाजलं.

२४ मग, बाळाचं दूध तुटलं तेव्हा ती लगेच त्याला शिलो इथे घेऊन गेली. तिने सोबत तीन वर्षांचा एक बैल, एक एफा माप पीठ* आणि एका मोठ्या मडक्यात द्राक्षारसही घेतला.+ या सगळ्या गोष्टी आणि आपल्या लहान मुलाला घेऊन ती शिलो+ इथे यहोवाच्या उपासना मंडपात* गेली. २५ तिथे त्यांनी त्या बैलाचा बळी दिला आणि मुलाला एलीकडे नेलं. २६ मग हन्‍ना एलीला म्हणाली: “माझ्या प्रभू, मी शपथ घेऊन सांगते, की ज्या स्त्रीने इथे तुमच्यासमोर उभं राहून यहोवाला प्रार्थना केली होती ती मीच आहे.+ २७ या मुलासाठीच मी प्रार्थना केली होती आणि यहोवाने माझी विनंती पूर्ण केली आहे.+ २८ आता त्या बदल्यात माझ्या या मुलाला मी यहोवाला देत आहे.* तो आयुष्यभरासाठी यहोवाचा होईल.”

मग त्याने* तिथे यहोवापुढे नमन केलं.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा