स्तोत्र
दावीदचं मिक्ताम.*
१६ हे देवा, माझं रक्षण कर, कारण मी तुझा आश्रय घेतलाय.+
२ मी यहोवाला म्हणालो: “हे यहोवा, माझ्यासाठी सर्व चांगल्या गोष्टींचा उगम तूच आहेस.
४ इतर देवांच्या मागे लागणारे आपल्या दुःखांत भर घालतात.+
मी कधीही त्यांच्यासाठी रक्ताची पेयार्पणं ओतणार नाही;
५ यहोवा माझा वाटा आणि वारसा आहे;+ तो माझा प्याला आहे.+
तू माझ्या वारशाचं रक्षण करतोस.
६ माझ्या वाट्याला सुंदर जागा आल्या आहेत.*
खरंच, मला मिळालेल्या वारशाबद्दल मी समाधानी आहे.+
७ मी यहोवाची स्तुती करीन, कारण त्याने मला सल्ला दिलाय.+
रात्रीच्या वेळीही माझ्या मनातले खोल विचार* मला मार्गदर्शन करतात.+
८ मी सतत यहोवाला माझ्यापुढे ठेवतो.+
तो माझ्या उजव्या हाताला असल्यामुळे, माझी पावलं कधीही डळमळणार* नाहीत.+
९ म्हणूनच माझं हृदय हर्षित होतं; मला अगदी मनापासून आनंद होतो.
आणि मी निर्धास्त राहतो.
१० कारण तू मला कबरेत* सोडून देणार नाहीस.*+
तू आपल्या एकनिष्ठ सेवकाला खळग्यात* राहू देणार नाहीस.*+
११ तू मला जीवनाचा मार्ग दाखवतोस.+