स्तोत्र
९७ यहोवा राजा बनला आहे!+
पृथ्वी आनंदित होवो.+
समुद्रातली सर्व बेटं हर्ष करोत.+
४ त्याच्या विजांमुळे उजेड पसरतो;
पृथ्वी हे पाहून थरथर कापते.+
५ यहोवासमोर, संपूर्ण पृथ्वीच्या प्रभूसमोर
पर्वत मेणासारखे वितळून जातात.+
६ आकाश त्याचं नीतिमत्त्व प्रकट करतं,
सगळी राष्ट्रं त्याचं तेज पाहतात.+
७ सर्व देवांनो, तुम्ही त्याला नमन करा.*+
८ सीयोन याबद्दल ऐकून जल्लोष करते.+
९ कारण हे यहोवा, संपूर्ण पृथ्वीवर तू सर्वोच्च देव आहेस;
इतर सर्व देवांपेक्षा तू खूप महान आहेस.+
१० यहोवावर प्रेम करणाऱ्या सर्व लोकांनो, वाईट गोष्टींचा द्वेष करा.+
१२ नीतिमान लोकांनो, यहोवामुळे आनंदित व्हा!
त्याच्या पवित्र नावाची* उपकारस्तुती करा!