वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • उत्पत्ती ४५
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

उत्पत्ती रूपरेषा

      • योसेफ आपली ओळख देतो (१-१५)

      • योसेफचे भाऊ याकोबला आणायला परत जातात (१६-२८)

उत्पत्ती ४५:१

समासातील संदर्भ

  • +उत्प ४३:३०
  • +प्रेका ७:१३

उत्पत्ती ४५:३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१/१९९९, पृ. ३०

उत्पत्ती ४५:४

समासातील संदर्भ

  • +उत्प ३७:२८; प्रेका ७:९

उत्पत्ती ४५:५

समासातील संदर्भ

  • +उत्प ४७:२३, २५; ५०:२०; स्तो १०५:१७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१/१९९९, पृ. ३०

उत्पत्ती ४५:६

समासातील संदर्भ

  • +उत्प ४१:३०; ४७:१८

उत्पत्ती ४५:७

तळटीपा

  • *

    किंवा “तुमच्यासाठी पृथ्वीवर उरलेले काही जण राहावेत.”

समासातील संदर्भ

  • +उत्प ४६:२६

उत्पत्ती ४५:८

तळटीपा

  • *

    शब्दशः “पित्यासारखा.”

समासातील संदर्भ

  • +स्तो १०५:२१; प्रेका ७:९, १०

उत्पत्ती ४५:९

समासातील संदर्भ

  • +उत्प ४५:२६
  • +प्रेका ७:१४

उत्पत्ती ४५:१०

समासातील संदर्भ

  • +उत्प ४६:३३, ३४; ४७:१; निर्ग ८:२२; ९:२६

उत्पत्ती ४५:११

समासातील संदर्भ

  • +उत्प ४७:१२

उत्पत्ती ४५:१२

समासातील संदर्भ

  • +उत्प ४२:२३

उत्पत्ती ४५:१४

समासातील संदर्भ

  • +उत्प ४६:२९

उत्पत्ती ४५:१८

तळटीपा

  • *

    किंवा “गोष्टींवर जगाल.”

समासातील संदर्भ

  • +उत्प ४७:६

उत्पत्ती ४५:१९

समासातील संदर्भ

  • +उत्प ४१:३९, ४०
  • +उत्प ४५:२७; ४६:५
  • +उत्प ४७:९

उत्पत्ती ४५:२०

समासातील संदर्भ

  • +उत्प ४६:६

उत्पत्ती ४५:२२

समासातील संदर्भ

  • +उत्प ४३:३४

उत्पत्ती ४५:२४

समासातील संदर्भ

  • +उत्प ४२:२१, २२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ६/२०१७, पृ. १६-१७

उत्पत्ती ४५:२६

समासातील संदर्भ

  • +स्तो १०५:२१
  • +उत्प ४२:३८; ४४:२७, २८

उत्पत्ती ४५:२८

समासातील संदर्भ

  • +उत्प ४६:३०

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

उत्प. ४५:१उत्प ४३:३०
उत्प. ४५:१प्रेका ७:१३
उत्प. ४५:४उत्प ३७:२८; प्रेका ७:९
उत्प. ४५:५उत्प ४७:२३, २५; ५०:२०; स्तो १०५:१७
उत्प. ४५:६उत्प ४१:३०; ४७:१८
उत्प. ४५:७उत्प ४६:२६
उत्प. ४५:८स्तो १०५:२१; प्रेका ७:९, १०
उत्प. ४५:९उत्प ४५:२६
उत्प. ४५:९प्रेका ७:१४
उत्प. ४५:१०उत्प ४६:३३, ३४; ४७:१; निर्ग ८:२२; ९:२६
उत्प. ४५:११उत्प ४७:१२
उत्प. ४५:१२उत्प ४२:२३
उत्प. ४५:१४उत्प ४६:२९
उत्प. ४५:१८उत्प ४७:६
उत्प. ४५:१९उत्प ४१:३९, ४०
उत्प. ४५:१९उत्प ४५:२७; ४६:५
उत्प. ४५:१९उत्प ४७:९
उत्प. ४५:२०उत्प ४६:६
उत्प. ४५:२२उत्प ४३:३४
उत्प. ४५:२४उत्प ४२:२१, २२
उत्प. ४५:२६स्तो १०५:२१
उत्प. ४५:२६उत्प ४२:३८; ४४:२७, २८
उत्प. ४५:२८उत्प ४६:३०
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
उत्पत्ती ४५:१-२८

उत्पत्ती

४५ हे ऐकल्यावर योसेफला आपल्या सर्व सेवकांपुढे आपल्या भावना आवरणं कठीण झालं,+ म्हणून तो म्हणाला: “सर्वांना बाहेर पाठवा!” मग सगळे जण बाहेर गेल्यावर, योसेफने आपल्या भावांना स्वतःची ओळख दिली.+

२ मग तो इतक्या मोठ्याने रडू लागला, की तिथे असलेल्या इजिप्तच्या लोकांनी ते ऐकलं आणि ही बातमी फारोच्या घरापर्यंत पोहोचली. ३ शेवटी योसेफ आपल्या भावांना म्हणाला: “मी योसेफ आहे. माझे वडील जिवंत आहेत का?” पण त्याच्या भावांना इतका धक्का बसला होता, की ते काहीच बोलू शकले नाहीत. ४ तेव्हा योसेफ आपल्या भावांना म्हणाला: “माझ्या जवळ या.” तेव्हा ते त्याच्या जवळ आले.

मग तो म्हणाला: “मी योसेफ, तुमचा भाऊ, ज्याला तुम्ही इजिप्तमध्ये विकलं होतं.+ ५ पण तुम्ही मला इथे विकलं, म्हणून आता एकमेकांवर रागावू नका आणि एकमेकांना दोषही देऊ नका; कारण, आपल्या सर्वांचा जीव वाचवण्यासाठी देवानेच मला तुमच्यापुढे इथे पाठवलं आहे.+ ६ देशातल्या दुष्काळाचं हे दुसरं वर्ष आहे+ आणि आणखीन पाच वर्षांपर्यंत नांगरणी किंवा कापणी होणार नाही. ७ देवाने अद्‌भुत रितीने तुमची सुटका करण्यासाठी आणि तुमच्या कुटुंबांचा नाश होऊ नये,* म्हणून तुमच्यासाठी मला इथे पाठवलं.+ ८ खरंतर तुम्ही मला पाठवलं नाही, तर मी फारोचा मुख्य सल्लागार,* त्याच्या घरादाराचा अधिकारी आणि इजिप्तच्या संपूर्ण देशाचा शासक+ बनावं, म्हणून खऱ्‍या देवानेच मला इथे पाठवलं.

९ लवकरात लवकर माझ्या वडिलांकडे परत जाऊन त्यांना म्हणा, ‘तुमचा मुलगा योसेफ असं म्हणतो, “देवाने मला संपूर्ण इजिप्तचा अधिकारी बनवलं आहे.+ तेव्हा आता उशीर न करता माझ्याकडे निघून या.+ १० तुम्ही गोशेन प्रांतात राहा,+ म्हणजे तुम्ही माझ्याजवळ असाल. तुम्ही, तुमची मुलं, तुमची नातवंडं, तुमचे कळप, तुमची गुरंढोरं आणि तुमचं सर्वकाही घेऊन इथे राहा. ११ मी तुम्हाला अन्‍नधान्य पुरवीन, कारण दुष्काळाची अजून पाच वर्षं बाकी आहेत.+ नाहीतर दुष्काळामुळे तुमची आणि तुमच्या घरच्यांची उपासमार होईल आणि तुमच्याकडे असलेलं सर्वकाही तुम्हाला गमवावं लागेल.”’ १२ तुम्ही आणि माझा भाऊ बन्यामीन स्वतःच्या डोळ्यांनी पाहत आहात, की तुमच्याशी बोलणारा मीच आहे.+ १३ म्हणून इजिप्तमध्ये माझं सगळं वैभव आणि तुम्ही जे काही पाहिलं, त्याबद्दल माझ्या वडिलांना जाऊन सांगा आणि त्यांना लवकरात लवकर इथे घेऊन या.”

१४ मग तो आपला भाऊ बन्यामीन याला मिठी मारून रडू लागला आणि बन्यामीनही त्याच्या गळ्यात पडून रडला.+ १५ त्यानंतर त्याने आपल्या सर्व भावांचं चुंबन घेतलं आणि तो त्यांच्यासोबत रडला. मग त्याचे भाऊ त्याच्याशी बोलू लागले.

१६ “योसेफचे भाऊ आले आहेत,” ही बातमी फारोच्या घरापर्यंत पोहोचली. हे ऐकून फारोला आणि त्याच्या सेवकांना आनंद झाला. १७ तेव्हा फारो योसेफला म्हणाला: “आपल्या भावांना सांग, ‘आपलं सामान जनावरांवर लादून कनान देशात जा, १८ तुमच्या पित्याला आणि तुमच्या कुटुंबांना घेऊन माझ्या देशात या. मी तुम्हाला इजिप्त देशातल्या सर्वात चांगल्या वस्तू देईन आणि देशात उत्पन्‍न होणाऱ्‍या सर्वात चांगल्या गोष्टी तुम्ही खाल.’”*+ १९ फारोने योसेफला त्यांना असंही सांगण्याची आज्ञा दिली:+ “तुमच्या मुलांना आणि बायकांना आणण्यासाठी इजिप्त देशातून बैलगाड्या घेऊन जा+ आणि तुमच्या वडिलांनाही बैलगाडीत बसवून इथे आणा.+ २० आपल्या मालमत्तेची काळजी करू नका,+ कारण इजिप्त देशातल्या सगळ्यात चांगल्या गोष्टी तुमच्याच आहेत.”

२१ तेव्हा इस्राएलच्या मुलांनी तसंच केलं आणि फारोच्या आज्ञेप्रमाणे योसेफने त्यांना बैलगाड्या आणि प्रवासासाठी लागणाऱ्‍या वस्तू दिल्या. २२ त्याने प्रत्येकाला कपड्यांचा एकेक जोड दिला, पण बन्यामीनला त्याने कपड्यांचे पाच जोड आणि ३०० चांदीचे तुकडे दिले.+ २३ त्याने इजिप्तच्या चांगल्या वस्तू दहा गाढवांवर, तसंच प्रवासासाठी लागणारं अन्‍नधान्य आणि गरजेच्या इतर वस्तू दहा गाढवींवर लादून आपल्या वडिलांसाठी पाठवल्या. २४ अशा रितीने, त्याने आपल्या भावांना पाठवून दिलं आणि ते जायला निघाले, तेव्हा तो त्यांना म्हणाला: “रस्त्याने जाताना एकमेकांवर रागावू नका.”+

२५ तेव्हा ते इजिप्तमधून निघून कनान देशात त्यांचा पिता याकोब याच्याकडे आले. २६ त्यांनी त्याला सांगितलं: “योसेफ अजून जिवंत आहे आणि तो संपूर्ण इजिप्त देशाचा शासक आहे!”+ पण, त्यांच्या बोलण्यावर त्याचा विश्‍वासच बसला नाही आणि तो सुन्‍न झाला.+ २७ पण जेव्हा त्यांनी योसेफने सांगितलेल्या सर्व गोष्टी त्याला सांगितल्या, आणि त्याला आणण्यासाठी योसेफने पाठवलेल्या बैलगाड्या त्याने पाहिल्या, तेव्हा कुठे त्याच्या जिवात जीव आला. २८ इस्राएल म्हणाला: “आता माझी खातरी पटली! माझा मुलगा योसेफ अजून जिवंत आहे! मरण्याआधी मला जाऊन त्याला पाहायचंय!”+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा