यशया
३३ हे नाश करणाऱ्या! हे विश्वासघात करणाऱ्या! तुझा धिक्कार असो!
तुझा अजून विश्वासघात झाला नसला,
तरी तू विश्वासघात करायचं संपवल्यावर, तुझा विश्वासघात केला जाईल.
२ हे यहोवा, आमच्यावर दया कर.+
आमची आशा तुझ्यावर आहे.
३ तुझी गर्जना ऐकून राष्ट्रांतले लोक पळ काढतात,
तू उभा राहतोस, तेव्हा राष्ट्रांची पांगापांग होते.+
४ अधाशी टोळ जसं सगळं काही फस्त करून टाकतात, तसं तुमच्या लोकांची लूट फस्त केली जाईल.
टोळधाडीप्रमाणे लोक त्यावर तुटून पडतील.
५ यहोवाचा गौरव होईल,
कारण तो अतिशय उंच ठिकाणी राहतो.
तो न्यायाने आणि नीतिमत्त्वाने सीयोनला भरून टाकेल.
७ पाहा! त्यांचे शूरवीर रस्त्यांवर दुःखाने ओरडत आहेत;
त्यांचे शांतीचे दूत ढसाढसा रडत आहेत.
८ राजमार्ग सुमसाम पडले आहेत;
रस्त्यांवर एकही प्रवासी नाही.
९ देश शोक करत आहे आणि तो कोमेजून चालला आहे.
लबानोन लज्जित झाला आहे;+ तो कुजला आहे.
शारोन वाळवंटासारखं झालं आहे,
आणि कर्मेल व बाशान आपल्या झाडांची पानं झाडून टाकत आहेत.+
११ तुम्हाला सुकलेल्या गवताचा गर्भ राहील आणि तुम्ही भुशाला जन्म द्याल.
तुमची दुष्ट मनोवृत्तीच तुम्हाला आगीसारखं भस्म करेल.+
१२ राष्ट्रा-राष्ट्रांतले लोक जळालेल्या चुनखडीच्या राखेसारखे होतील,
त्यांना काटेरी झुडपांसारखं कापून जाळून टाकलं जाईल.+
१३ दूर राहणाऱ्यांनो, मी काय करणार आहे ते ऐका!
आणि जवळ राहणाऱ्यांनो, माझी ताकद ओळखा!
१४ सीयोनमधले पापी लोक घाबरले आहेत;+
देवाला सोडून देणाऱ्यांचा थरकाप उडाला आहे:
‘जिथे भस्म करणारी आग आहे, तिथे आपल्यापैकी कोण राहू शकतं?+
कधीही न विझणाऱ्या आगीच्या ज्वालांजवळ, कोण राहू शकतं?’
१५ जो नेहमी नीतीच्या मार्गावर चालतो,+
जो खरं बोलतो,+
जो खोटेपणाची आणि फसवणुकीची कमाई नाकारतो,
ज्याचे हात लाच घ्यायला पुढे होत नाहीत,+
जो रक्तपाताच्या गोष्टी ऐकू येऊ नयेत, म्हणून आपले कान बंद करतो,
आणि चुकीच्या गोष्टी दिसू नयेत, म्हणून जो आपले डोळे झाकून घेतो,
१६ तोच उंच ठिकाणी राहील;
त्याचं सुरक्षित आश्रयस्थान खडकांवरच्या मजबूत किल्ल्यात असेल,
त्याला खायला भाकर मिळत राहील,
आणि त्याच्यासाठी पाण्याचा पुरवठा कधीही संपणार नाही.”+
१७ तू स्वतःच्या डोळ्यांनी एक वैभवशाली राजा पाहशील;
तू तुझ्या डोळ्यांनी एक दूरचा देश पाहशील.
१८ तू तुझ्या मनात तो भीतिदायक काळ आठवून म्हणशील:
“सचिव कुठे आहे?
कर तोलून देणारा कुठे आहे?+
ज्याने बुरूज मोजलेत तो कुठे आहे?”
१९ तू घमेंडी लोकांना पुन्हा कधी पाहणार नाहीस;
ज्यांची भाषा समजायला खूपच कठीण आहे,
ज्यांची भाषा वेगळी आणि परकी आहे, अशा लोकांना तू पुन्हा कधीच पाहणार नाहीस.+
२० आम्ही जिथे आमचे सण साजरे करतो ती सीयोन नगरी पाहा!+
यरुशलेम ही शांतीने राहण्याची जागा असल्याचं तुझ्या डोळ्यांना दिसून येईल;
यरुशलेम नगरी अशा एका तंबूसारखी होईल जो कधीही हलवला जाणार नाही,+
ज्याचे खिळे कधीही उखडले जाणार नाहीत,
आणि ज्याचे दोरखंड कधीही कापले जाणार नाहीत.
२१ तिथे महापराक्रमी यहोवा आमचं संरक्षण करेल;
जसं नद्या आणि रुंद कालवे एखाद्या प्रदेशाचं संरक्षण करतात, तसं तो आमचं संरक्षण करेल.
त्या नद्यांमध्ये किंवा कालव्यांमध्ये शत्रूंच्या नावा* प्रवेश करणार नाहीत,
किंवा त्यांतून मोठमोठी जहाजं जाणार नाहीत.
२२ कारण यहोवा आमचा न्यायाधीश आहे,+
यहोवा आम्हाला नियम देणारा आहे,+
यहोवा आमचा राजा आहे;+
तोच आम्हाला वाचवेल.+
२३ शत्रूंच्या जहाजांचे दोर ढिले पडतील;
ते शीडकाठी स्थिर ठेवू शकणार नाहीत,
किंवा शीड पसरवू शकणार नाहीत;
त्या वेळी, भरपूर लुटीच्या मालाची वाटणी होईल;
अगदी लुळापांगळाही भरपूर लूट घेईल.+
२४ “मी आजारी आहे,” असं देशातला एकही रहिवासी म्हणणार नाही.+
तिथे राहणाऱ्या लोकांचे अपराध माफ केले जातील.+