नीतिवचनं
१ दावीदचा मुलगा,+ इस्राएलचा राजा+ शलमोन याची नीतिवचनं:+
२ बुद्धी+ आणि शिक्षण* मिळवण्यासाठी;*
बुद्धीची वचनं समजून घेण्यासाठी;
३ सखोल समज देणारं शिक्षण+ मिळवण्यासाठी;
नीतिमत्त्व,+ निर्णयशक्ती*+ आणि सरळपणा* विकसित करण्यासाठी;
तरुणाला ज्ञान आणि विचारशक्ती देण्यासाठी,+ ही नीतिवचनं लिहिण्यात आली आहेत.
७ यहोवाचं* भय* ही ज्ञानाची सुरुवात आहे.+
मूर्खच बुद्धीला आणि शिक्षणाला तुच्छ लेखतात.+
९ त्यांनी दिलेलं शिक्षण तुझ्या डोक्यावर सुंदर मुकुटासारखं;+
आणि तुझ्या गळ्यात मौल्यवान हारासारखं आहे.+
१० माझ्या मुला, जर पापी लोकांनी तुला मोहात पाडायचा प्रयत्न केला, तर त्यांचं ऐकू नकोस.+
११ जर ते म्हणाले: “आमच्यासोबत चल.
आपण खून करण्यासाठी लपून बसू.
मजा म्हणून निर्दोष लोकांवर हल्ला करायला, आपण लपून बसू.
१३ आपण त्यांची सगळी मौल्यवान संपत्ती हडपू;
त्या लुटीने आपण आपली घरं भरू.
१४ तूही आमच्यासोबत चल,
चोरलेल्या वस्तू आपण सारख्या वाटून घेऊ.”
१५ तर माझ्या मुला, त्यांच्यामागे जाऊ नकोस.
त्यांच्या वाटेवर पाऊलही ठेवू नकोस,+
१६ कारण त्यांची पावलं दुष्टपणा करण्यासाठी धावतात;
रक्त सांडण्यासाठी ते घाई करतात.+
१७ पक्ष्याच्या देखत त्याच्यासाठी जाळं पसरणं व्यर्थ आहे.
१८ म्हणूनच हे लोक खून करण्यासाठी लपून बसतात;
दुसऱ्यांचा जीव घेण्यासाठी ते टपून बसतात.
२० खरी बुद्धी+ रस्त्यावर हाक मारते.+
ती चौकाचौकांत मोठ्याने घोषणा करते.+
२१ गजबजलेल्या रस्त्यांच्या कोपऱ्यावरून ती बोलावते.
शहराच्या प्रवेशद्वारांवर ती म्हणते:+
२२ “अज्ञानी लोकांनो, तुम्ही तुमच्या अज्ञानावर कधीपर्यंत प्रेम करत राहाल?
थट्टा करणाऱ्यांनो, तुम्ही कधीपर्यंत थट्टा करण्यात आनंद मानत राहाल?
आणि मूर्खांनो, तुम्ही कधीपर्यंत ज्ञानाचा तिरस्कार करत राहाल?+
२३ माझं ताडन स्वीकारून आपले मार्ग बदला.*+
मग मी तुम्हाला बुद्धीचं सामर्थ्य देईन;
मी माझे शब्द तुम्हाला प्रकट करीन.+
२४ मी हाक मारली, पण तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष करत राहिलात,
मी हात पुढे केला, पण कोणीही लक्ष दिलं नाही.+
२५ माझ्या सर्व सल्ल्यांकडे तुम्ही दुर्लक्ष करत राहिलात
आणि माझं ताडन नाकारत राहिलात.
२६ म्हणून, जेव्हा तुमच्यावर संकट कोसळेल, तेव्हा मीही हसेन;
तुम्हाला ज्या संकटाची भीती वाटते, ते तुमच्यावर येईल, तेव्हा मी तुमची थट्टा करीन.+
२७ कारण संकट तुमच्यावर वादळासारखं येईल,
विपत्ती तुमच्यावर वादळी वाऱ्यासारखी येईल,
आणि तुमच्यावर यातना आणि पीडा येतील.
२८ त्या वेळी ते मला हाक मारत राहतील, पण मी उत्तर देणार नाही;
ते मला शोधण्याचा खूप प्रयत्न करतील, पण त्यांना मी सापडणार नाही.+
३० त्यांनी माझा सल्ला नाकारला;
आणि माझ्या ताडनाचा नेहमी अनादर केला.
३१ म्हणून, त्यांना त्यांच्या वागणुकीचे परिणाम भोगावे लागतील.*+
त्यांच्या दुष्ट योजनांचं* त्यांना पुरेपूर फळ मिळेल.
३२ माझ्याकडे पाठ फिरवल्यामुळे भोळे आपला जीव गमावतील,
मूर्खांच्या बेपर्वाईमुळे त्यांचा नाश होईल.