स्तोत्र
दावीदचं गीत. संचालकासाठी सूचना. “पहाटेची हरिणी”* या चालीवर गायलं जावं.
२२ माझ्या देवा, माझ्या देवा, तू मला का सोडून दिलंस?+
तू मला का वाचवत नाहीस?
मी दुःखाने केलेला आक्रोश तू का ऐकत नाहीस?+
२ माझ्या देवा, मी दिवसा तुला विनवणी करतो, पण तू उत्तर देत नाहीस;+
रात्रीही मी तुला हाका मारत राहतो.
४ आमच्या वाडवडिलांनी तुझ्यावर भरवसा ठेवला;+
त्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तू त्यांना संकटातून सोडवत राहिलास.+
५ त्यांनी तुला हाक मारली आणि तू त्यांना वाचवलंस;
त्यांनी तुझ्यावर भरवसा ठेवला आणि त्यांची निराशा झाली नाही.*+
८ “त्याला यहोवावर भरवसा आहे, तर आता त्यानेच त्याची सुटका करावी!
त्याचं त्याच्यावर प्रेम आहे ना, मग त्यानेच त्याला वाचवावं!”+
९ तूच मला माझ्या आईच्या उदरातून* बाहेर आणलंस,+
मी आईच्या अंगावर पीत होतो, तेव्हापासून तू मला सुरक्षित ठेवलंस.
१० जन्मापासूनच मला तुझ्या हाती सोपवण्यात आलंय;*
मी आईच्या पोटात होतो, तेव्हापासून तू माझा देव आहेस.
१३ शिकारीचे तुकडेतुकडे करणाऱ्या, एखाद्या गरजणाऱ्या सिंहासारखा,+
माझ्या शत्रूंनी मला गिळण्यासाठी जबडा पसरलाय.+
१४ मला पाण्यासारखं ओतण्यात आलंय;
माझी सगळी हाडं सांध्यांतून निखळली आहेत.
१५ एखाद्या खापरीसारखी माझी शक्ती सुकून गेली आहे;+
माझी जीभ टाळूला चिकटली आहे;+
तू मला मरणाच्या धुळीत लोळवलं आहेस.+
दुर्जनांच्या टोळीसारखा त्यांनी माझ्याभोवती गराडा घातलाय,+
एखाद्या सिंहासारखे ते माझ्या हातापायांच्या चिंधड्या करतात.+
१७ मी आपली सगळी हाडं मोजू शकतो.+
ते नजर रोखून मला पाहत राहतात.
१९ पण हे यहोवा, माझ्यापासून दूर राहू नकोस.+
तूच माझी ताकद आहेस. माझ्या मदतीला धावून ये.+
२१ सिंहाच्या जबड्यातून+ आणि रानबैलांच्या शिंगांपासून मला वाचव;
माझ्या प्रार्थनेचं उत्तर दे आणि मला सोडव.
२३ यहोवाची भीती बाळगणाऱ्यांनो, त्याची स्तुती करा!
याकोबच्या संततीने* त्याचा गौरव करावा.+
इस्राएलच्या संततीने* त्याची भीती बाळगावी.
त्याने त्या मनुष्यापासून आपलं तोंड फिरवलं नाही.*+
त्याची मदतीची याचना त्याने ऐकली.+
२५ मी मोठ्या मंडळीत तुझी स्तुती करीन;+
तुझी भीती बाळगणाऱ्यांसमोर मी आपले नवस फेडीन.
तुम्ही सर्वकाळ जीवनाचा आनंद लुटा!*
२७ पृथ्वीच्या कानाकोपऱ्यांतले लोक यहोवाची आठवण करून त्याच्याकडे वळतील.
राष्ट्रांतली सर्व घराणी तुझ्यापुढे नमन करतील.+
२८ कारण राज्य यहोवाचं आहे;+
तो राष्ट्रांवर शासन करतो.
२९ पृथ्वीवरचे सर्व श्रीमंत* लोक मेजवानी करतील आणि त्याला नमन करतील;
धुळीला मिळणारे सर्व त्याच्यापुढे गुडघे टेकतील;
त्यांच्यापैकी कोणीही आपला जीव वाचवू शकत नाही.
३० त्यांचे वंशज* त्याची सेवा करतील;
येणाऱ्या पिढीला यहोवाबद्दल सांगितलं जाईल.
३१ ते येतील आणि त्याच्या नीतिमत्त्वाबद्दल सांगतील.
येणाऱ्या पिढ्यांना ते त्याच्या कार्यांबद्दल सांगतील.