नीतिवचनं
४ बुद्धीला म्हण, “तू माझी बहीण आहेस.”
आणि समजशक्तीला म्हण, “तू माझी नातलग आहेस.”
६ मी आपल्या घराच्या खिडकीतून;
आपल्या जाळीतून खाली पाहिलं.
७ रस्त्यावरच्या भोळ्याभाबड्या* लोकांना पाहताना,
मला तरुणांमध्ये एक असा तरुण दिसला, ज्याला समज नव्हती.+
८ तो तिच्या घराजवळच्या रस्त्यावरून गेला
आणि मग सरळ तिच्या घराच्या दिशेने चालू लागला.
१० तेव्हा मी एका स्त्रीला त्याच्याजवळ येताना पाहिलं.
वेश्येसारखे कपडे*+ घातलेली ती स्त्री फार धूर्त होती.
११ ती मोठमोठ्याने बोलणारी आणि बेपर्वा वृत्तीची होती.+
तिचा पाय कधीच घरात टिकत नव्हता.
१३ तिने त्याला धरून त्याचं चुंबन घेतलं.
ती निर्लज्जपणे त्याला म्हणाली:
१४ “मला शांती-अर्पणं द्यायची होती.+
आज मी माझे नवस फेडले.
१५ म्हणून मी तुला भेटायला आले.
मी तुला शोधलं आणि तू मला सापडलास!
१७ मी माझ्या बिछान्यावर दालचिनी, अगरू* आणि गंधरस शिंपडलाय.+
१८ चल, आपण सकाळपर्यंत प्रेमरसाने धुंद होऊ;
एकमेकांच्या प्रेमात बुडून जाऊ.
१९ कारण माझा नवरा घरी नाही;
तो लांबच्या प्रवासाला गेलाय.
२० त्याने सोबत पैशांची थैली नेली आहे,
तो पौर्णिमेपर्यंत परत येणार नाही.”
२२ मग कत्तलखान्याकडे जाणाऱ्या बैलासारखा;
खोड्यांत* अडकवण्यासाठी नेल्या जाणाऱ्या मूर्खासारखा,
तो अचानक तिच्यामागे चालू लागला.+
२३ पण शेवटी त्याच्या काळजात बाण घुसेल;
जाळ्यात झेपावणाऱ्या पक्ष्यासारखी त्याची अवस्था होईल,
आपला जीव जाईल, याची त्याला जाणीव नाही.+
२४ म्हणून माझ्या मुला,* माझं ऐक;
माझ्या शब्दांकडे लक्ष दे.
२५ आपलं मन तिच्या मार्गांकडे वळू देऊ नकोस.
आणि तिच्या वाटांकडे वाहवत जाऊ नकोस.+
२६ कारण तिने बऱ्याच जणांना घायाळ करून पाडलंय.+
तिने असंख्य माणसांचा जीव घेतलाय.+
२७ तिचं घर माणसाला कबरेकडे* नेतं;
त्याची वाट मृत्यूच्या आतल्या खोल्यांकडे जाते.