लूकने सांगितलेला संदेश
३ तिबिर्य कैसर याच्या राज्याच्या १५ व्या वर्षी, पंतय पिलात यहूदीयाचा राज्यपाल होता आणि हेरोद+ हा गालीलचा प्रांताधिकारी होता; तसंच, हेरोदचा* भाऊ फिलिप्प हा इतुरीया आणि त्राखोनीती या भागांचा प्रांताधिकारी होता आणि लूसनिय हा अबिलेनेचा प्रांताधिकारी होता, २ शिवाय, हन्ना आणि कयफा हे मुख्य याजकांपैकी होते;+ त्याच काळात, जखऱ्याचा मुलगा योहान याला देवाने ओसाड रानात+ संदेश दिला.+
३ त्यामुळे, तो यार्देन नदीच्या आसपासच्या सगळ्या प्रदेशांत गेला आणि पापांच्या क्षमेसाठी पश्चात्तापाचं चिन्ह म्हणून बाप्तिस्मा* घ्या, अशी घोषणा करू लागला.+ ४ हे यशया संदेष्ट्याच्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणेच झालं: “ओसाड रानात घोषणा करणाऱ्या एकाचा आवाज ऐकू येतोय: ‘यहोवासाठी* मार्ग तयार करा! त्याच्यासाठी रस्ते मोकळे करा.+ ५ प्रत्येक दरी भरून काढली जाईल आणि प्रत्येक डोंगर आणि टेकडी सपाट केली जाईल. वाकडेतिकडे रस्ते सरळ केले जातील आणि खडबडीत रस्ते सपाट केले जातील. ६ आणि सगळी माणसं देवाने केलेलं तारण* पाहतील.’”+
७ योहान आपल्याकडे बाप्तिस्मा घ्यायला येणाऱ्या लोकांच्या समुदायाला म्हणायचा: “अरे विषारी सापाच्या पिल्लांनो! देवाच्या येणाऱ्या क्रोधापासून तुम्ही वाचू शकता असं तुम्हाला कोणी सांगितलं?+ ८ आधी तुमचा पश्चात्ताप तुमच्या कामांतून दाखवून द्या.* ‘आपण तर अब्राहामचे वंशज आहोत,’ असं आपल्या मनात म्हणू नका. कारण मी तुम्हाला सांगतो, देवाला पाहिजे असेल तर तो अब्राहामसाठी या दगडांपासूनसुद्धा मुलं उत्पन्न करू शकतो. ९ पाहा! कुऱ्हाड तर केव्हाच झाडाच्या मुळाशी ठेवण्यात आली आहे. जे झाड चांगलं फळ देत नाही ते तोडून आगीत टाकलं जाईल.”+
१० तेव्हा लोक त्याला विचारायचे: “तर मग, आम्ही काय करावं?” ११ तो त्यांना म्हणायचा: “ज्याच्याजवळ दोन झगे आहेत* त्याने त्यातला एक, अशा माणसाला द्यावा ज्याच्याजवळ एकही नाही. आणि ज्याच्याजवळ खायला काही आहे त्यानेही असंच करावं.”+ १२ त्याच प्रकारे, जकातदारसुद्धा त्याच्याकडे बाप्तिस्मा घ्यायला आले+ आणि त्यांनी त्याला विचारलं: “गुरुजी, आम्ही काय करावं?” १३ तो त्यांना म्हणाला: “नेमून दिलेल्या करापेक्षा जास्त मागू नका.”*+ १४ सैन्यात असलेल्यांनी त्याला विचारलं: “आम्ही काय करावं?” तेव्हा तो त्यांना म्हणाला: “कोणाला छळू नका* किंवा कोणावर खोटा आरोप लावू नका.+ तर, तुम्हाला मिळणाऱ्या पगारात* समाधानी राहा.”
१५ त्या काळात लोक ख्रिस्त* यायची वाट पाहत होते आणि सगळे लोक योहानबद्दल मनातल्या मनात असा विचार करत होते, की “हाच तर ख्रिस्त नसेल?”+ १६ योहान त्या सगळ्यांना म्हणाला: “मी तुम्हाला पाण्याने बाप्तिस्मा देतो, पण जो येणार आहे त्याला माझ्यापेक्षा जास्त अधिकार आहे. मी तर त्याच्या जोड्यांचे बंद सोडायलाही योग्य नाही.+ तो तुम्हाला पवित्र शक्तीने आणि अग्नीने बाप्तिस्मा देईल.+ १७ त्याच्या हातात धान्यापासून भुसा वेगळा करायचं फावडं आहे आणि तो त्याचं खळं* पूर्णपणे स्वच्छ करेल. तो गहू कोठारांत जमा करेल, तर भुसा अशा आगीत जाळून टाकेल, जी विझवता येत नाही.”
१८ याशिवाय, योहानने आणखी बऱ्याच गोष्टी त्यांना शिकवल्या आणि तो आनंदाचा संदेश घोषित करत राहिला. १९ पण, त्याने प्रांताधिकारी हेरोद याच्या भावाची बायको हेरोदिया हिच्याबद्दल आणि हेरोदने केलेल्या इतर सगळ्या दुष्ट कामांबद्दल त्याची कानउघाडणी केली होती. २० त्यामुळे हेरोदने योहानला तुरुंगात डांबलं+ आणि अशा रितीने आपल्या दुष्ट कार्यांत आणखी भर घातली.
२१ सगळे लोक बाप्तिस्मा घेत होते, तेव्हा येशूचाही बाप्तिस्मा झाला.+ तो प्रार्थना करत होता, तेव्हा आकाश उघडलं गेलं+ २२ आणि पवित्र शक्ती* एका कबुतरासारखी त्याच्यावर आली आणि स्वर्गातून असा आवाज ऐकू आला: “तू माझा प्रिय मुलगा आहेस; तू माझं मन आनंदित केलं आहेस.”+
२३ येशूने+ आपल्या कार्याला सुरुवात केली तेव्हा तो साधारण ३० वर्षांचा होता.+ आणि असं समजलं जायचं, की तो
योसेफचा मुलगा होता,+
योसेफ एलीचा,
२४ एली मत्ताथचा,
मत्ताथ लेवीचा,
लेवी मल्खीचा,
मल्खी यन्नयचा,
यन्नय योसेफचा,
२५ योसेफ मत्तिथ्याचा,
मत्तिथ्या आमोसचा,
आमोस नहूमचा,
नहूम हेस्लीचा,
हेस्ली नग्गयचा,
२६ नग्गय महथचा,
महथ मत्तिथ्याचा,
मत्तिथ्या शिमयीचा,
शिमयी योसेखचा,
योसेख योदाचा,
२७ योदा योहानानचा,
योहानान रेशाचा,
रेशा जरूब्बाबेलचा,+
जरूब्बाबेल शल्तीएलचा,+
शल्तीएल नेरीचा,
२८ नेरी मल्खीचा,
मल्खी अद्दीचा,
अद्दी कोसामचा,
कोसाम एल्मदामचा,
एल्मदाम एरचा,
२९ एर येशूचा,
येशू अलियेजरचा,
अलियेजर योरीमचा,
योरीम मत्ताथचा,
मत्ताथ लेवीचा,
३० लेवी शिमोनचा,
शिमोन यहूदाचा,
यहूदा योसेफचा,
योसेफ योनामचा,
योनाम एल्याकीमचा,
३१ एल्याकीम मलआचा,
मलआ मिन्नाचा,
मिन्ना मत्ताथाचा,
मत्ताथा नाथानचा,+
नाथान दावीदचा,+
इशाय ओबेदचा,+
ओबेद बवाजचा,+
बवाज सल्मोनचा,+
सल्मोन नहशोनचा,+
३३ नहशोन अम्मीनादाबचा,
अम्मीनादाब अर्णयचा,
अर्णय हेस्रोनचा,
हेस्रोन पेरेसचा,+
पेरेस यहूदाचा,+
याकोब इसहाकचा,+
इसहाक अब्राहामचा,+
अब्राहाम तेरहचा,+
तेरह नाहोरचा,+
सरूग रऊचा,+
रऊ पेलेगचा,+
पेलेग एबरचा,+
एबर शेलहचा,+
३६ शेलह केनानचा,
केनान अर्पक्षदचा,+
अर्पक्षद शेमचा,+
शेम नोहाचा,+
नोहा लामेखचा,+
मथुशलह हनोखचा,
हनोख यारेदचा,+
यारेद महललेलचा,+
महललेल केनानचा,+
अनोश शेथचा,+
शेथ आदामचा,+
आदाम देवाचा मुलगा होता.