स्तोत्र
दावीदचं गीत.
א [आलेफ ]
ב [बेथ ]
४ यहोवालाच आपला सर्वात मोठा आनंद मान,
म्हणजे तो तुझ्या मनातल्या इच्छा पूर्ण करेल.
ג [गिमेल ]
६ तो तुझं नीतिमत्त्व पहाटेच्या प्रकाशासारखं
आणि तुझा न्याय दुपारच्या उन्हासारखा चमकू देईल.
ד [दालेथ ]
आपल्या दुष्ट योजना सफल करणाऱ्या माणसामुळे
संतापू नकोस.+
ה [हे ]
ו [वाव ]
१० थोड्याच काळाने दुष्ट लोक नाहीसे होतील;+
त्यांच्या पूर्वीच्या ठिकाणी तू त्यांना शोधलंस,
तरी ते तुला सापडणार नाहीत.+
११ पण नम्र लोकांना पृथ्वीचा वारसा मिळेल,+
भरपूर शांती असल्यामुळे त्यांच्या आनंदाला सीमा राहणार नाही.+
ז [झाइन ]
१२ दुष्ट माणूस नीतिमानाविरुद्ध षड्यंत्र करतो;+
तो त्याच्यावर दातओठ खातो.
१३ पण यहोवा त्या दुष्टावर हसेल,
कारण त्याच्या नाशाचा दिवस येणार, हे त्याला माहीत असतं.+
ח [हेथ ]
१४ दीनदुबळ्यांना आणि गोरगरिबांना खाली पाडण्यासाठी;
सरळ मार्गाच्या लोकांची कत्तल करण्यासाठी,
दुष्ट आपल्या तलवारी उपसतात आणि आपली धनुष्यं ताणतात.
१५ पण त्यांची तलवार त्यांच्याच हृदयात शिरेल;+
त्यांची धनुष्यं मोडून टाकली जातील.
ט [तेथ ]
१६ नीतिमानाजवळ थोडं थोडकंच असलं,
तरी बऱ्याच दुष्ट लोकांच्या समृद्धीपेक्षा ते चांगलं आहे.+
१७ कारण दुष्टांचे हात तोडून टाकले जातील,
पण नीतिमानांना यहोवा आधार देईल.
י [योद ]
१९ संकटाच्या काळात त्यांना लज्जित व्हावं लागणार नाही;
दुष्काळातही त्यांच्याजवळ भरपूर अन्न असेल.
כ [खाफ ]
२० पण दुष्टांचा नाश होईल;+
यहोवाचे शत्रू कुरणांतल्या हिरव्यागार गवतासारखे सुकून जातील;
ते धुरासारखे नाहीसे होतील.
ל [लामेद ]
२२ देव ज्यांना आशीर्वाद देतो त्यांना पृथ्वीचा वारसा मिळेल,
पण तो ज्यांना शाप देतो त्यांचा नाश होईल.+
מ [मेम ]
נ [नून ]
२५ मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालोय,
पण आजपर्यंत मी एकाही नीतिमान माणसाला निराधार झालेलं,+
किंवा त्याच्या मुलाबाळांना अन्नासाठी* भीक मागत असलेलं पाहिलं नाही.+
२६ तो गरजूंना नेहमी उदारपणे मदत करतो,+
त्याच्या मुलाबाळांना देवाकडून आशीर्वाद मिळतात.
ס [सामेख ]
२७ वाइटापासून फिरून चांगलं ते कर,+
म्हणजे तू सर्वकाळ टिकून राहशील.
ע [आयन ]
פ [पे ]
३१ देवाचं नियमशास्त्र त्याच्या हृदयात असतं.+
त्याची पावलं कधीही अडखळणार नाहीत.+
צ [सादे ]
३२ दुष्ट माणूस नीतिमानावर टपलेला असतो,
त्याचा जीव घेण्याची तो संधी शोधत असतो.
ק [खुफ ]
३४ यहोवाची आशा धर आणि त्याच्या मार्गावर चाल,
म्हणजे तो तुझा गौरव करून तुला पृथ्वीचा वारसा देईल.
दुष्टांचा नाश होईल,+ तेव्हा तू पाहशील.+
ר [रेश ]
३५ मी दुष्ट आणि क्रूर माणसाला,
आपल्या मातीत जोमाने वाढणाऱ्या हिरव्यागार झाडासारखं बहरताना पाहिलंय.+
ש [शिन ]
३८ पण सर्व अपराध्यांचा नाश केला जाईल;
दुष्टांच्या भविष्याचा अंत होईल.+
ת [ताव ]
४० यहोवा त्यांना साहाय्य करेल आणि त्यांची सुटका करेल.+
त्यांना दुष्टांच्या हातून सोडवून, तो त्यांचा बचाव करेल,
कारण ते त्याचा आश्रय घेतात.+