अनुवाद
३२ “अहो आकाशांनो, मी बोलीन ते कान लावून ऐका.
आणि पृथ्वी माझ्या तोंडून निघणारे शब्द ऐको.
२ माझ्या सूचना पावसासारख्या पडतील;
माझे शब्द गवतावर पडणाऱ्या रिमझिम पावसासारखे,
हिरवळीवर कोसळणाऱ्या सरींसारखे,
आणि झिरपणाऱ्या दवासारखे असतील.
३ कारण मी यहोवाचं नाव घोषित करीन.+
लोकांनो, तुम्ही आपल्या देवाच्या महानतेबद्दल सांगा!+
५ हे लोकच दुष्टपणे वागले आहेत.+
ती त्याची मुलं नाहीत, दोष त्यांच्यातच आहे.+
ही दुष्ट आणि कपटी पिढी आहे!+
तोच तुम्हाला जीवन देणारा, तुमचा पिता नाही का?+
त्यानेच तुम्हाला घडवून, स्थिर केलं नाही का?
७ जरा जुने दिवस आठवा;
मागच्या पिढ्यांबद्दल विचार करा.
आपल्या पित्याला विचारा, म्हणजे तो तुम्हाला सांगेल;+
आपल्या वडीलधाऱ्यांना विचारा, म्हणजे ते तुम्हाला सांगतील.
८ सर्वोच्च देवाने जेव्हा राष्ट्रांना त्यांचा वारसा दिला,+
जेव्हा त्याने आदामच्या मुलांना* एकमेकांपासून वेगळं केलं,+
तेव्हा त्याने इस्राएलच्या मुलांच्या संख्येप्रमाणे+
राष्ट्रांच्या सीमा ठरवल्या.+
त्याचं संरक्षण करण्यासाठी त्याने त्याला घेरा घातला, त्याचा सांभाळ केला,+
११ गरुड जसा आपलं घरटं हलवतो,
आपल्या पिल्लांवर तरंगत राहतो,
आणि आपले पंख पसरून
त्यांना त्यांवर उचलून घेतो,+
१२ तसाच यहोवा स्वतः याकोबला मार्ग दाखवत राहिला;+
त्याच्यासोबत कोणी परका देव नव्हता.+
१३ देवाने त्याला पृथ्वीच्या उच्च स्थानांवर स्वारी करू दिली.+
त्याने शेतांचा उपज खाल्ला.+
देवाने खडकातल्या मधाने त्याचं पोषण केलं.
गारगोटी खडकांतलं तेल,
१४ गायींचं लोणी आणि मेंढ्यांचं दूध,
तसंच धष्टपुष्ट मेंढे
आणि बाशानचे एडके व बकरे,
यांसोबत सगळ्यात उत्तम गहू त्याने खाल्ला;+
आणि तो रसाळ द्राक्षांची मदिरा* प्यायला.
१५ पण यशुरून* लठ्ठ झाला, तेव्हा धीटपणे लाथा मारू लागला.
(तू धष्टपुष्ट झाला आहेस, फुगला आहेस.)+
म्हणून त्याने आपल्या निर्माणकर्त्या देवाला सोडून दिलं,+
आणि आपल्या तारणाच्या खडकाला तुच्छ लेखलं.
१७ ते देवाला नाही, तर दुष्ट स्वर्गदूतांना बलिदानं देत होते,+
त्यांना ज्यांची ओळख नव्हती अशा देवांना,
अलीकडेच आलेल्या नवीन देवांना,
तुमच्या वाडवडिलांनाही माहीत नसलेल्या देवांना ते बलिदानं देत होते.
१९ यहोवाने हे पाहिलं, तेव्हा त्याने त्यांच्याकडे पाठ फिरवली+
कारण त्याच्या मुलांनी व मुलींनी त्याला चीड आणली होती.
२० तो म्हणाला, ‘त्यांच्यापासून मी माझं तोंड फिरवीन;+
त्यांचं काय होतं ते मी पाहीन.
२१ जो मुळात देवच नाही, त्याला नमन करून त्यांनी मला भडकवलं;*+
निरुपयोगी देवांची उपासना करून त्यांनी मला चीड आणली;+
आता मीही अशा राष्ट्राकडून त्यांना ईर्ष्येला पेटवीन, जे मुळात राष्ट्रच नाही;+
एका मूर्ख राष्ट्राद्वारे मी त्यांना चीड आणीन.+
२२ कारण माझ्या रागाने एक अग्नी पेटला आहे;+
तो कबरेच्या* तळापर्यंत जळत जाईल,+
तो पृथ्वी आणि तिचं उत्पन्न भस्म करेल
आणि पर्वतांचे पायथे जाळून टाकेल.
२३ मी त्यांची संकटं वाढवीन;
माझे सगळे बाण त्यांच्यावर चालवीन.
मी त्यांच्यामध्ये फाडून खाणारे हिंस्र पशू,+
आणि जमिनीवर सरपटणारे विषारी प्राणी पाठवीन.
२६ मी असं म्हणालो असतो: “मी यांची पांगापांग करतो;
लोकांना यांची आठवणही राहणार नाही असं करतो,”
ते म्हणाले असते: “हे सगळं यहोवाने केलं नाही,
तर आम्ही आमच्याच बळाने विजयी झालो.”+
२९ ते समंजस* असते तर किती बरं झालं असतं!+ त्यांनी यावर मनन केलं असतं.+
आपलं काय होईल याचा त्यांनी विचार केला असता.+
३० फक्त एक माणूस हजारांचा पाठलाग कसा करू शकतो?
आणि फक्त दोघं, दहा हजारांना कसे पळवून लावू शकतात?+
त्यांच्या खडकाने त्यांना विकल्याशिवाय,+
आणि यहोवाने त्यांना शत्रूंच्या हाती दिल्याशिवाय हे शक्य नाही.
३२ त्यांचा द्राक्षवेल सदोमच्या द्राक्षवेलापासून
आणि गमोराच्या द्राक्षमळ्यांतून निघालाय.+
त्यांची द्राक्षं विषारी आहेत,
त्यांचे द्राक्षांचे घड कडू आहेत.+
३३ त्यांचा द्राक्षारस सापांच्या विषासारखा,
नागांच्या जीवघेण्या विषासारखा आहे.
३४ त्यांची सगळी कृत्यं माझ्याजवळ साठवलेली आहेत,
ती माझ्या कोठारात बंद आहेत.+
३५ सूड घेणं माझं काम आहे, मी परतफेड करीन,+
ठरलेल्या वेळी त्यांचा पाय घसरेल,+
त्यांच्या संकटांचा दिवस जवळ आहे,
आणि त्यांच्यावर ओढवणारे प्रसंग वेगाने येत आहेत.’
३६ कारण यहोवा आपल्या लोकांचा न्याय करेल,+
आपल्या सेवकांमध्ये जराही शक्ती राहिली नाही हे पाहून;
३७ तेव्हा तो म्हणेल, ‘त्यांचे देव कुठे आहेत?+
त्यांनी ज्याचा आश्रय घेतला होता, तो त्यांचा खडक कुठे आहे?
आता त्यांनीच उठून तुम्हाला मदत करावी
आणि त्यांनीच तुम्हाला आश्रय द्यावा.
मारणारा मीच आणि जिवंत करणाराही मीच आहे.+
४० मी माझा हात आकाशाकडे उचलून म्हणतो,
“माझ्या सर्वकाळाच्या जीवनाची शपथ,”+
४१ जेव्हा मी माझ्या चकाकणाऱ्या तलवारीला धार लावीन
आणि न्याय करण्यासाठी माझा हात उचलीन,+
तेव्हा मी माझ्या शत्रूंचा सूड घेऊन त्यांची परतफेड करीन,+
आणि माझा द्वेष करणाऱ्यांना शिक्षा देईन.
४२ माझे बाण रक्त पिऊन धुंद होतील,
ते घात झालेल्यांचं आणि बंदिवानांचं रक्त पितील;
मी शत्रूंच्या पुढाऱ्यांची डोकी कापून टाकीन,
माझी तलवार त्यांचं मांस खाईल.’
४३ राष्ट्रांनो, त्याच्या लोकांसोबत आनंदी व्हा,+
कारण तो आपल्या सेवकांच्या रक्ताचा सूड घेईल,+
तो आपल्या शत्रूंचा सूड घेऊन त्यांची परतफेड करेल+
आणि आपल्या लोकांच्या देशासाठी प्रायश्चित्त करेल.”*
४४ अशा रितीने मोशेने, नूनचा मुलगा होशा*+ याच्यासोबत मिळून, या गीताचे सर्व शब्द इस्राएली लोकांना ऐकवले.+ ४५ सर्व लोकांना हे गीत ऐकवल्यावर, ४६ मोशे त्यांना म्हणाला: “आज मी तुम्हाला जो इशारा दिला आहे, त्याप्रमाणे या सर्व गोष्टींकडे मन लावा,+ म्हणजे तुम्ही आपल्या मुलाबाळांना या नियमशास्त्रातल्या सर्व आज्ञा काळजीपूर्वक पाळायला शिकवू शकाल.+ ४७ कारण हे फक्त पोकळ शब्द नाहीत, तर हे तुमचं जीवन आहे,+ आणि या गोष्टी पाळल्या तर तुम्ही यार्देन पार करून ज्या देशात जात आहात, तिथे तुम्हाला मोठं आयुष्य लाभेल.”
४८ त्याच दिवशी यहोवा मोशेला म्हणाला: ४९ “यरीहोसमोर मवाब देशातल्या, अबारीम डोंगरांतल्या+ नबो पर्वतावर+ जा आणि मी इस्राएली लोकांना जो कनान देश वारसा म्हणून देत आहे, तो देश पाहा.+ ५० मग, जसा तुझा भाऊ अहरोन याचा होर पर्वतावर मृत्यू झाला+ आणि तो आपल्या पूर्वजांना जाऊन मिळाला,* तसाच या पर्वतावर गेल्यावर तुझाही मृत्यू होईल आणि तूही आपल्या पूर्वजांना जाऊन मिळशील, ५१ कारण झिनच्या ओसाड रानात, कादेशमध्ये मरीबा इथे वाहणाऱ्या पाण्याजवळ,+ तुम्ही दोघंही इस्राएली लोकांसमोर माझ्याशी अविश्वासूपणे वागलात आणि तुम्ही इस्राएली लोकांसमोर मला पवित्र ठरवलं नाही.+ ५२ म्हणून, मी इस्राएली लोकांना देत असलेल्या देशात तू जाऊ शकणार नाहीस. तो देश तू दुरूनच पाहशील.”+